बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान याने सोमवारी आपला ५६ वा जन्मदिन साजरा केला. जन्मदिनाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा तो मीडिया समोर आला होता. त्यावेळी त्याने त्याला सापाने दंश केल्याच्या घटनेची माहिती देण्याबरोबरच आपला बहुचर्चित चित्रपट बजरंगी भाईजानच्या सिक्वलबद्दलही मीडियाशी चर्चा केली.
त्यावेळी सलमानने बजरंगी भाईजानच्या सिक्वलच्या टायटलचाही खुलासा केला. त्याने सांगितले की, बजरंगी भाईजानमध्ये प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे पिता केव्ही विजयेंद्र प्रसाददेखील त्याची साथ देणार आहेत. त्यामुळे सलमान खान आणि केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी मिळून या चित्रपटाचे नाव पवन पुत्र भाईजान असे ठेवले आहे. बजरंगी भाईजानमध्ये सलमानच्या व्यक्तिरेखेचे नाव पवन असते. त्यामुळे चित्रपटाच्या सिक्वलचे नाव त्याच्या व्यक्तिरेखेवरूनच ठेवण्यात आले आहे. पवन पुत्र भाईजानव्यतिरिक्त सलमान खानने आपला सुपरहिट कॉमेडी चित्रपट नो एंट्रीच्या सिक्वलबद्दलही खूप मोठी घोषणा केली आहे. टायगर ३ च्या शूटिंगनंतर नो एंट्री सिक्वलवरही काम करण्यात येणार आहे. नो एंट्री हा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या मल्टीस्टारर चित्रपटात सलमान खानव्यतिरिक्त अनिल कपूर आणि फरदीन खानसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …