ठळक बातम्या

बंगळुरू बुल्सच्या प्रशिक्षकांनी यू मुंबाला डिवचले

बंगळुरू – प्रो कबड्डी लीगच्या आठव्या सत्राची सुरुवात यू मुंबाविरुद्ध बंगळुरू बुल्स या सामन्याने होणार आहे. या सामन्याआधी बंगळुरू बुल्सचे प्रशिक्षक रणधीर सिंह सेहरावत यांनी यू मुंबा संघाला खोचक टोला लगावला. बंगळुरू बुल्स संघाची खास गोष्ट म्हणजे, त्यांनी स्पर्धा सुरू झाल्यापासून एकदाही संघाचे प्रशिक्षक बदललेले नाहीत. इतर संघांचे अनेक प्रशिक्षक आले आणि गेले, पण बंगळुरू संघाने मात्र रणधीर सेहरावत यांची साथ कधीही सोडली नाही. सेहरावत यांनीदेखील आपल्या नावलौकिकाला साजेसे असे खेळाडू घडवले. अजय ठाकूर, मनजीत चिल्लरपासून ते पवन सेहरावत अन् प्रदीप नरवालपर्यंत अनेक खेळाडूंच्या जडणघडणीत रणधीर यांचा मोलाचा वाटा होता. आता आठव्या हंगामासाठीदेखील रणधीर सेहरावत आपल्या संघासमवेत सज्ज आहेत. पहिल्या सामन्याआधी रणधीर यांनी स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या यू मुंबा संघाला एक टोमणा लगावला आहे. बंगळुरूने यंदाच्या लिलावात फारसे महागडे खेळाडू विकत घेतले नाहीत. त्याऐवजी त्यांनी सर्व लक्ष नव्या दमाच्या खेळाडूंवर केंद्रित केल्याचे दिसले. याबद्दल जेव्हा रणधीर यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, कोरोनाच्या काळात या स्पर्धेला विश्रांती मिळाली. या दोन वर्षांच्या कालावधीत मी देशभरात अनेक ठिकाणी फिरलो आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा खेळ पाहिला. जर तुम्ही नव्या आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली नाहीत, तर त्यांची कारकीर्द पुढे कशी घडणार?, असा विचार मी कायम करत असतो आणि म्हणूनच मी स्टार खेळाडू विकत घेण्यासाठी लिलावात आटापिटा करत नाही. उलट, जे खेळाडू मी घेतले आहेत, त्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देऊन भविष्यातील स्टार खेळाडू बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. महाराष्ट्रातील काही प्रशिक्षक गावाकडच्या मुलांना संधी देण्यास तयार नसतात. ते मुंबईतील खेळाडूंवर आपला डाव खेळतात. पण माझी विचार करण्याची पद्धत थोडीशी निराळी आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू निवडतो आणि त्यांना संधी देतो. यंदाच्या हंगामात आमची योजना ठरलेली होती. एका खेळाडूंवर संपूर्ण संघाने अवलंबून राहण्यापेक्षा कमी अनुभवी पण प्रतिभावान असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यानुसार आम्ही संघाची बांधणी केली आहे. पवनशिवाय आणखीही काही आघाडीचे चढाईपटू मला आमच्या संघात घेता आले याचा मला आनंद आहे. माझा संघासाठीचा विचार अतिशय सरळ आहे. मी वैयक्तिक नात्याबद्दल विचार करत नाही, तर सामन्याची आणि स्पर्धेची नक्की काय गरज आहे ते पाहतो आणि त्यानुसार संघ निवडतो, असेही रणधीर यांनी स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment