फ्रेंच ओपनच्या सेमिफायनलमध्ये सिंधूला पराभवाचा धक्का

पॅरिस – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेता पी. व्ही. सिंधू शनिवारी येथे महिला एकेरी सेमिफायनलमध्ये जपानच्या सयाका तकाहाशीकडून तीन गेमपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभूत होत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर झाली.

हैदराबादची २६ वर्षीय खेळाडू पहिला गेम जिंकण्याचा फायदा घेऊ शकली नाही व जगातील १५ व्या क्रमांकाच्या तकाहाशीकडून २१-१८, १६-२१, १२-२१ अशी पराभूत झाली. सिंधूला अशाप्रकारे २९ वर्षीय जपानी खेळाडूकडून आठ सामन्यात चौथा पराभव पत्कारावा लागला. सध्याची विश्वचॅम्पियन सिंधूला मागील आठवड्यात ओडेन्सेमध्ये डेन्मार्क ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला. जागतिक सातव्या क्रमांकाच्या भारतीय खेळाडूने सकारात्मक अंदाजात सुरुवात करेल. दोन्ही खेळाडू पहिल्या गेममध्ये एक वेळ ५-५ आणि त्यानंतर ९-९ असे बरोबरीत आहे. दरम्यान, जपानी खेळाडूंनी ब्रेकच्या वेळी ११-१० अशी आघाडी घेतली. सिंधूने ब्रेकनंतर पुनरागमन केले व १७-१६ अशी आघाडी घेतली. सिंधूकडे त्यानंतर चार गेम पॉईंट होते, ज्यातील तिने दोन गमावले, पण तिसऱ्यावर ती पहिले गेम आपल्या नावे करण्यास यशस्वी राहिली. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने सुरुवातीला आपली लय कायम राखली. ती एक वेळ ५-२ अशी आघाडीवर होती, पण तकाहाशीने लवकरच ६-६ अशी बरोबरी केली. सिंधूने चांगले रक्षण केले आणि काही आक्रमक शॉट खेळत ९-६ अशी आघाडी मिळवली व ब्रेकपर्यंत स्वत:ला पुढे ठेवले. पण ब्रेकनंतर सिंधूने सलग चुका केल्या, ज्यामुळे जपानी खेळाडू १३-१२ अशी पुढे गेली. तकाहाशीने लवकरच १८-१४ अशी आघाडी मिळवली व सामना निर्णायक गेमपर्यंत खेचला. तिसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडंूनी सुरुवातीला एकमेकांना चांगली टक्कर दिली, पण खेळ पुढे जात असताना तकाहाशीने आपला दबदबा कायम राखला. ती ब्रेकपर्यंत ११-६ अशी पुढे होती. तिने आपली आघाडी कायम राखली व नऊ मॅच पॉईंट प्राप्त केले. सिंधू यापैकी फक्त एकचा बचाव करू शकली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …