ठळक बातम्या

फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट : जर्मनीतही रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या

नवी दिल्ली – एकीकडे भारतात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून, दिलासा मिळत असताना दुसरीकडे फ्रान्समध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेला सुरुवात झाली आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी गंभीर इशारा दिला आहे. पाचव्या लाटेत कोरोना संक्रमण वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोना लवकरच पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असताना, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. दुसरीकडे जर्मनीतही कोरोना पुन्हा एकदा बळावला असून, गेल्या २४ तासांत ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत.

फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, शेजारच्या अनेक देशांमध्ये कोरोनाची पाचवी लाट आली आहे. मात्र आम्ही जो अनुभव घेत आहोत त्यानुसार ही स्पष्टपणे पाचव्या लाटेची सुरुवात आहे. याआधी फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोरोनाचे ११ हजार ८८३ नवे रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. फ्रान्समध्ये सलग दोन दिवस १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
तसेच फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी कोरोनासंबंधी इशारा देताना ६५ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना रेस्तराँत जाण्याआधी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच इंटरसिटी ट्रेनमधून प्रवास करण्याआधी कोरोना बुस्टर डोसचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. १५ डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी यावेळी लसीच्या दुसºया डोससाठी पात्र असूनही लस न घेतलेल्या ६० लाख नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही, असा इशारा देताना मॅक्रॉन यांनी कोरोना तसेच थंडीच्या दिवसातील आजारांपासून नागरिकांचे रक्षण करण्याकडे सरकारचे लक्ष असेल, असे सांगितले आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …