ठळक बातम्या

फुटबॉल : ब्राझील दौऱ्यासाठी भारतीय महिला टीमची घोषणा

नवी दिल्ली – भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनेर्बी यांनी ब्राझील दौऱ्यादरम्यान चार देशांच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी २३ सदस्यीय टीमची गुरुवारी घोषणा के ली. भारतीय टीम ब्राझीलमधील मनॉस येथे चार देशांच्या फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेणार आहे. या स्पर्धेत भारतीय टीमला यजमान संघासह चिली आणि व्हेनेझुएलाविरोधात खेळावे लागणार आहे. डेनेर्बी यांनी येथे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, ‘ब्राझील संघ एक चांगला संघ आहे. आपण मुख्य प्रशिक्षकपदी आल्यापासून कोणत्याही अन्य टीमने भारताला इतके क डवे आव्हान कधीही दिलेले नाही, जितके पुढील आठवड्यात ब्राझीलकडून मिळणार आहे.
दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय टीमला अत्यंत तांत्रिक पद्धतीने खेळी करणाऱ्या चिलीच्या कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, असे डेनेर्बी यांनी सांगितले. अर्थात भारतीय संघही कठोर मेहनत घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हेनेझुएलाविरोधातील सामनाही भारतीय टीमसाठी कठीण असेल, असे ते म्हणाले.
फिफा क्रमवारीमध्ये ५७ व्या स्थानावर असलेल्या भारतीय टीमचा २५ नोव्हेंबरला ब्राझीलशी मुकाबला होणार आहे. जागतिक क्रमवारीत ३७ व्या स्थानी असलेल्या चिलीविरोधात भारताची २८ नोव्हेंबरला गाठ पडणार आहे, तर व्हेनेझएला (जागतिक क्रमवारीत ५६ वे स्थान) विरोधात १ डिसेंबरला सामना होणार आहे. ब्राझीलने या स्पर्धेकरिता तगड्या टीमची घोषणा केली आहे. मार्टा दा सिल्व्हा आणि फॉर्मिगा मोटा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा या टीममध्ये समावेश असणार आहे. या दोघीही ब्राझील खेळाडू जगभरात या खेळाच्या रोल मॉडेल असल्याचे डेनेर्बी यांचे मत आहे.
संघात कोण?
गोलकीपर : आदिति चौहान, एम. लिनथोइंगंबी देवी, सौम्या नारायणसामी.
डिफेंडर : दलिमा छिब्बर, स्वीटी देवी, रितु राणी, आशालता देवी, मनीसा पन्ना, शिल्की देवी, रंजना चानू, डब्ल्यू. लिनथोइंगंबी देवी.
मिडफील्डर : इंदुमति कथिरेसन, संजू, अंजू तमांग, मार्टिना थोकचोम, कार्तिका अंगमुथु, कमला देवी.
फॉरवर्ड : मनीषा कल्याण, प्यारी शाशा, रेणु, डांगमेई ग्रेस, सौम्या गुगुलोथ, मरियम्मल बालमुरुगन.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …