फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला कोरोना

पॅरिस – अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मेस्सीसोबत आणखी तीन खेळाडूही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत.पीएसजीने शनिवारी संघासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यास कोरोना झाल्याचे सर्वप्रथम कळवले होते. पण, नंतर करण्यात आलेल्या चाचणीत कर्मचारी नव्हे तर मेस्सी आणि तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचे उघड झाले. युआन बेर्नाट, सर्जियो रिको आणि नॅथन बिटुमाजाला यांना कोरोना झाल्याचे पीएसजीकडून कळवण्यात आले. पीएसजीचा पुढील सामना दुबळ्या वेनेस संघाशी आहे. त्यामुळे या चार जणांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली असून मेस्सीशिवाय फ्रेंच कपमध्ये पीएसजी संघाला खेळावे लागणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …