दबंग स्टार सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलमानचा हा डान्स व्हिडीओ त्याच्या दबंग टूरचा आहे. त्यातील सलमान खानचे फुगलेले पोट पाहून चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. व्हिडीओत सलमानचे वजन चांगलेच वाढलेले दिसून येतेयं. खरेतर सलमानला बॉलीवूडच्या फिट ॲक्टरपैकी एक मानले जाते. तो नेहमीच स्वत:ला फिट आणि फाइन ठेवत असतो. चाहते आणि फॉलोअर्स तर त्याच्याकडे एक फिटनेस मोटीव्हेटर म्हणून पाहतात. अशात सलमानचे वाढलेले पोट पाहिल्यानंतर मात्र त्यांची चांगलीच निराशा झाली आहे.
या व्हिडीओत सलमान दबंगच्या एका गाण्यावर नाचताना दिसून येतोयं. खरेतर त्यामध्ये त्याचे वजन चांगलेच वाढलेले आहे आणि फुगलेले पोट लक्ष वेधून घेतेयं. सलमान खानला याकरिता ट्रोलही करण्यात आले आहे. त्याकरिता सलमानला ट्रोलही केले जात आहे. एका फॅनने लिहिले आहे,’पोट तर पाहा,’ तर दुसऱ्याने लिहिले आहे,’भाईचे पॅक्स तर फॅमिली पॅक बनले आहेत,’ तर अन्य एकाने लिहिले आहे,
‘पोट खूप बाहेर आलेय. जिमला बाय बाय केले का?’
सलमान अखेरच्या वेळेस अंतिम या चित्रपटात दिसून आला आहे. या चित्रपटात त्याने एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.