ठळक बातम्या

फायनलमध्ये सरस्वती स्पोर्ट्सचे विद्यार्थी संघाला आव्हान

मुंबई – ओम साईश्वर सेवा मंडळ आयोजित पुरुष व महिला मुंबई जिल्हा खो-खो निवड चाचणी स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू चौक, लालबाग, मुंबई येथील क्रीडांगणात सुरू आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा २०-१७ (१०-०८-१०-०९) असा तीन गुणांनी पराभव केला. सरस्वतीतर्फे श्रेयस राऊळने १:१० मि. संरक्षण केले व आक्रमणात ०८ गडी बाद करून अष्टपैलू खेळ केला, करण गारोळेने १:३०, १:१० मि. संरक्षण करून आक्रमणात ०४ गडी बाद केले. अमर हिंदतर्फे नीरव पाटीलने १:३०, २:१० मि. संरक्षण करून आक्रमणात ०३ गडी बाद केले. किरण कर्णवारने १:२०, १:१० मि. संरक्षण करून आक्रमणात ०४ गडी बाद करून चांगला खेळ केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर या संघाचा १३-११ (१०-०६-०३-०५) असा ५ मि. राखून ०२ गुणांनी पराभव केला. दुसरीकडे महिलांचे दोन्ही फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले, ज्यातील पहिल्या सामन्यात माहीमच्या सरस्वती कन्या संघाने लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा ०८-०७ (०५-०४-०३-०३) असा ०१ गुणांनी, तर दुसऱ्या सामन्यात दादरच्या शिवनेरी सेवा मंडळाने दादरच्याच अमर हिंद मंडळाचा ०९-०८ (०४-०४-०५-०४) असा ०१ गुणांनी पराभव केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment