फायझर लसीचा बुस्टर डोस ओमिक्रॉनवर ९० टक्के प्रभावी

नवी दिल्ली – फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर ९० टक्के प्रभावी असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर ९० टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे. ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला, ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.

संशोधनात सहभागी ८, ४३,२०८ लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बुस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बुस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली. क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्त्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझरच्या कोविड लसीचा बुस्टर (तिसरा) डोस कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारातील मृत्यू ९० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. त्याचवेळी, कोरोना संक्रमित रुग्णांची संख्यादेखील सतत वाढत आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या २६ कोटी ९३ लाख २१ हजार ८६६ च्या पुढे गेली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत ५३ लाख १० हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …