फळ

झाडे सर्व सजीवांच्या पंगतीत वरिष्ठता क्रमांकात दुसºया स्थानावर आहेत. त्यांची वरिष्ठता जितकी मोठी तितका त्यांचा मान मोठा, तसेच त्यांचा अनुभव व त्यांचे गुण मोठे.
बहुतांशी वृक्ष फळ देणारे असतात, त्यांचा मुख्य उद्देश तुम्हाला फळ देणे नसून, त्यांच्या प्रजातीची संख्या वाढविणे हा असतो. प्राणी जेव्हा ही फळे खातात, तेव्हा या झाडांचे बीज इस्तत: पसरतात व नवीन पिढी जन्माला येण्यासाठी व्यवस्था तयार होते.

झाड आपल्या बियांची म्हणजे लेकुरवळ्यांची काळजी कशी घेते, हे पाहणे वैशिष्ठपूर्ण असते. प्राणी व पक्षी यांनी अपरिपक्व फळांना खाऊ नये, यासाठी झाडांनी घेतलेली खबरदारी चार प्रकारे आढळते.
पहिली सुरक्षा : कच्ची फळे या स्थितीत हिरवी दिसावीत हा प्रयत्न असतो, यामुळे प्राण्यांच्या नजरेस फळे न पडू देणे हे उद्दिष्ट असते. हिरव्या रंगामुळे पानांच्या आड फळे लपून राहतात या परिस्थितीत किटक मात्र फळांवर ताव मारू शकतात, म्हणून दुसरी खबरदारी घेतली जाते.

दुसरी खबरदारी : फळांची चव मुद्दाम आंबट, कडू वा तुरट ठेवली जाते, यात आंबटपणाला प्राधान्य दिले आहे. सर्व किटक व प्राणी आंबटपणाला दूर ठेवतात, काही झाडे अजून चतुराई करतात, कच्च्या फळात विशिष्ठ द्रव उत्पन्न करतात, ज्याला आपण चीक म्हणतो. हा चीक प्राण्यांच्या अंगाला (तोंडाला) लागला की, त्यातून जखम होते किंवा खाज सुटते, म्हणून ते या फळांकडे फिरकत नाहीत, किती मोठे संरक्षण सहज दिलेले दिसते.
तिसरी खबरदारी : फळे टणक असतात. टणक कवच किंवा साल असल्यामुळे प्राणी, पक्षी हे दात किंवा चोच लावून फळाला नुकसान करत नाहीत आणि समजा तसे केलेच, तरीही आत बीज सुरक्षित राहते, त्याला धक्का पोहोचत नाही.

चौथी सुरक्षा : बिया बरोबर फळाच्या मध्यावर असतात, याचे कारण पिकलेले फळ वाºयाने खाली पडते, तेव्हा जमिनीवर फळ पडल्यावर त्याचा गर हा धक्का सहन करून, बियांना इजा होणार नाही याची खबरदारी घेतली जाते.
आता जसे जसे फळ मोठे होईल, तसे आतील बीज मोठे होत जाते. जोपर्यंत बीज म्हणजे झाडाचे अपत्य, पूर्ण मोठे होऊन, परिपक्व होत नाही, म्हणजे नवीन झाड बनण्याची क्षमता तयार होत नाही, तोपर्यंत झाड फळाची आंबट, कडू, तुरट चव बदलत नाही. हे करत असताना झाडाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले असते, गर्भधारणेआधी सुंदर, आकर्षक फुले जी फुलपाखरे, मधमाशी वगैरे प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी पेश केलेली असतात त्यांना काम झाल्यावर लगोलग विद्रुप करून झडून टाकले जाते. आता त्यांचा सुवास नष्ट करून उग्र वास येईल अशी सोय केली जाते.

बीज पूर्ण रूपात तयार झाल्यावर, म्हणजे त्यापासून नवीन झाड तयार होईल, अशी परिस्थिती आल्यावरच, झाड फळांचा रंग बदलविण्यास सुरुवात करते. आता आकर्षक रंगात फळे प्राण्याच्या समोर पेश केली जातात, त्यांचा रंग पिवळा, लाल, गुलाबी, नारंगी, तांबडा, केशरी म्हणजे असे रंग जे प्राण्यांच्या डोळ्यांना भावतील, आकर्षित करतील असे रंग असतात, इथे हिरवा रंग कटाक्षाने टाळला जातो, कारण भविष्यात प्राण्यांच्यात गैरसमज न होऊ देणे हा भाव असतो, यासोबतच फळात मधुर गोडवा दिला जातो व त्याचा वास दूरवर जाईल याची पण व्यवस्था केली जाते.
आई मग ती कोणतीही असो, आपल्या अपत्याची काळजी घेण्यासाठी किती आटापिटा करते हे वरील उदाहरणावरून आपल्याला समजलेच असेल.

परिपक्व फळातील बिजाला मात्र आई स्वत:पासून जितके होईल तितके दूर फेकण्याचा प्रयत्न करते, हे पक्षी व प्राण्यांच्या माध्यमातून केले जाते. निसर्गाने फक्त प्राण्यांनाच उत्क्रांतीचा फायदा दिलेला नाही, झाडांमध्ये सुद्धा उत्क्रांती झाली आहे.
विजय लिमये/9326040204\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …