ठळक बातम्या

फरारी किरण गोसावीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पैशाची देवाणघेवाण झाल्याचे आरोप झाल्यापासून फरार असलेआणि एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेला किरण प्रकाश गोसावी (वय ३७ रा. वाशी, नवी मुंबई) याला पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज परिसरातून अटक करण्यात आली.या कारवाईच्या आधीचा किरण गोसावीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यातून त्यानं प्रभाकर साईल याच्यावरच पैसे घेतल्याचे आरोप केले आहेत तसेच, राज्यातील राजकीय नेत्यांना मदतीची साद घातली.दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली. परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरूणाला फसवणुकीच्या तीन वर्षांपुर्वीच्या गुन्ह्यात तो फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपुर्वी त्याला लुकआऊट नोटीस बजावली होती. मुंबईतील क्रुझ पार्टीत अटकेतील आर्यन खान बरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकानेत्याला कात्रजमधील मांगडेवाडीतील लॉजमधून ताब्यात घेतले.
परदेशात नोकरीच्या आमिषाने तरूणाला तीन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी किरण गोसावी याच्याविरूद्ध पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी यापुर्वी त्याची मैत्रिण शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) हिला अटक केली आहे. त्यानंतर गोसावी विरूद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके मागावर होती. गोसावी लखनऊ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक तेथे पोहोचले होत, मात्र पोलीस पाठलाग करीत असल्याची माहिती मिळताचे त्याने तेथूनही पळ काढला होता. यादरम्यान तो वेगवेगळ्या प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देत होता. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. बुधवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास किरण गोसावी कात्रज परिसरात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मांगडेवाडीतील लॉजमध्ये छापा टाकून त्याला अटक केली. त्याला कोर्टापुढे हजर करण्यात आले.
आरोपी किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. यातुन गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. त्यामुळे आणखी तपासासाठी किरण गोसावीला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. दरम्यान दोन्ही वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोसावीला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साईल यांनी केलेले सर्व आरोप खोटे
गोसावीला ताब्यात घेण्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं प्रभाकर साईलनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. साईल हा खोटं बोलत आहे. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन भावांना या प्रकरणात पैसे मिळाले आहेत. पोलिसांनी त्यांचे सीडीआर तपासावेत. त्याला कोणाच्या आणि काय ऑफर आल्या होत्या हे समोर येईल. माझेही फोन रेकॉर्ड तपासावेत. क्रूझवरील कारवाईनंतर पैशाच्या देवाणघेवाणीबाबत माझं त्याच्याशी कधीच बोलणं झालेलं नाही. त्याच्याशी माझं झालेलं संभाषण आधीचं आहे. आर्यन खान प्रकरणी माझं त्याच्याशी अजिबात बोलणं झालेलं नाही,’ असं गोसावी यानं म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …