ठळक बातम्या

‘फनरल’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविल्या गेलेल्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या आगामी मराठी चित्रपटाची नामांकित ‘इफ्फी’ महोत्सवातही वर्णी लागली आहे. गोव्यात होऊ घातलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२१ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश असून, ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने स्थान पटकावले आहे. याआधी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव, अंबरनाथ महोत्सव, राजस्थान चित्रपट महोत्सव या महोत्सवांमध्ये ‘फनरल’ चित्रपटाची निवड झाली होती. यातल्या अंबरनाथ व राजस्थान चित्रपट महोत्सवात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत.

सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंत:र्मुख करेल, असे निर्माते व लेखक रमेश दिघे सांगतात. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करून सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडल्याचे दिग्दर्शक विवेक दुबे सांगतात’. आरोह वेलणकर, विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे, संभाजी भगत आदि मान्यवर कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच ‘फनरल’ चित्रपटाच आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होताना दिसतंय.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …