जलयुक्त शिवारला ठाकरे सरकारकडून पूर्ण क्लीन चिट नाही

जलसंधारण विभागाचा अहवाल
सिंचनाची सुविधा निर्माण झाली

कामाची अंमलबजावणी पारदर्शक
मुंबई – महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती, परंतु या चौकशीत जलयुक्त शिवार अभियानाला क्लीन चिट दिली जात आहे. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली, तसेच शेतकºयांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा निष्कर्ष राज्य सरकारच्या जल संधारण विभागाच्या अहवालात काढला आहे. योजनेत अनियमितता झाल्याचा आक्षेप कॅगच्या अहवालात घेतला गेला होता. आता या योजनेतील ५८ हजारांपेक्षा जास्त झालेल्या कामांचा आढावा घेऊन कॅगच्या अहवालात करण्यात आलेला हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे. मात्र याबाबत राज्य सरकारने या प्रकरणी पूर्ण क्लीन चीट दिलेली नाही असा खुलासा केला आहे.

या अभियानात तांत्रिक त्रुटी होत्या, तसेच कामात अनियमितता होती, अशी ताशेरे कॅगच्या अहवालात ओढण्यात आले होते. या योजनेचं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं नाही, असंही अहवालात म्हटलं होतं; मात्र आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने हे कॅगचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केलेल्या कामांमुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा निर्माण झाली. पाणी पातळी वाढली आणि कामाची पारदर्शक अंमलबजावणी झाली, असं जलसंधारण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.
०००००००००००००००००००००

सत्याचाच विजय होतो – सुधीर मुनगंटीवार
ठाकरे सरकारने जलयुक्त शिवारला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्याचाच विजय होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ठिकाणी झालेल्या त्रुटीच्या आधारे संपूर्ण योजनेला नावं ठेवणं चुकीचं आहे, तेच ठाकरे सरकारने केलं. हे सरकार बदनामीचं काम खूप चांगल्या रितीने करतं, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …