ठळक बातम्या

प्लास्टिकच्या कचºयाची डोकेदुखी

राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावर, तसेच सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे, पण विविध प्रकारची पेये, पाण्याच्या बाटल्या आदी उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकच्या वापरास संमती आहे. ग्राहकांकडून या उत्पादनांचा वापर झाल्यानंतर निर्माण होणाºया प्लास्टिक कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असली, तरी मात्र आजही अनेक दुकानदार, भाजीवाले, फळवाले सर्रास प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहेत. आज प्रत्येक वस्तूला प्लास्टिकचे वेस्टन वापरले जात आहे. कापडी पिशव्यांऐवजी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्तोरस्ती प्लास्टिक कचºयांचे ढिगारे व उडणारा कचरा शहर व गावांना बकाल स्थितीत आणत आहे. शहर व गावांचे प्रशासन त्यावर उपाययोजना करण्यास हतबल ठरत आहे. त्यामुळे शासनानेच आता प्लास्टिक उत्पादनावर बंदी आणण्याची गरज आहे.

आता तर भोजनावळीतूनही भांडी हद्दपार होऊ लागली आहेत. पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लास्टिकचे ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. तोच कचरा नाल्या, गटारे यामध्ये साचतो. परिणामी नाल्या-गटारे यांचे प्रवाह बंद होतात.
पाळीव जनावरे प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडत असतात. एखाद्या मोकळ्या मैदानात या घाणीचे मोठे डोंगर उभारायचे किंवा हा कचरा समुद्रात फेकून द्यायचा. पावसाळ्याच्या दिवसांत या प्लास्टिकमुळे नदी-नाले, गटारी तुंबून बसतात आणि मग आपल्याला मुंबईमध्ये २६ जुलैसारख्या महापुराच्या घटनांना सामोरे जावे लागते. प्लास्टिकचा कचरा जाळल्याने निर्माण होणारा वायू सजीवांच्या जीवनाला घातक ठरतो. त्यामुळे शासनाने प्लास्टिक निर्मितीवर एकतर आळा घालावा किंवा प्लास्टिकचा पुनर्वापर करणारे प्रकल्प ठिकठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे.

प्लास्टिक जाळून वीज निर्मिती करणे, रस्ते बांधकामात प्लास्टिकचा वापर करणे, अशा उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे. वापरलेले प्लास्टिक ग्राहकांकडून परत मिळविणे, त्याचे रिसायकलिंग करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठे संकट उभे ठाकणार आहे. प्लास्टिकचे सुक्ष्म बारीक बारीक कण आपल्या पिण्याच्या पाण्यात व अन्न पदार्थात मिसळू लागले आहेत. यामुळे प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. विशेषत: शासनकर्त्यांनी या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लास्टिकमुळे कमालीचे प्रदूषण वाढते हेही तितकेच खरे. महापालिकेच्या हद्दीत प्लास्टिक वापरावर निर्बंध आणून संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे, तरच या गैरगोष्टींना आळा बसू शकेल. याकामी फक्त इच्छाशक्ती हवी.
े बाळासाहेब हांडे / ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …