प्रो कबड्डी लीग : यू मुंबा व बंगळुरू बुल्सच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात

बंगळुरू – कोरोना विषाणू महामारीच्या धोक्यामुळे प्रो कबड्डी लीग (पीकेएल)च्या आठव्या सत्राचे आयोजन एकाच ठिकाणी बायो-बबलमध्ये येथे बुधवारपासून सुरू होणार आहे, जिथे प्रेक्षकांना येण्यास मनाई असेल. बारा संघांच्या लीगची सुरुवात माजी चॅम्पियन यू मुंबा व बंगळुरू बुल्सच्या सामन्याने होईल, तर दुसरा सामना तेलुगू टाइटन्सविरुद्ध तमिल थलाइवाज यांच्यात असेल. या सत्रात सुरुवातीला चार दिवस व त्यानंतर प्रत्येक शनिवारी प्रत्येकी तीन सामने खेळवले जातील. बुधवारी खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या सामन्यात गतविजेता बंगाल वॉरियर्सचा सामना यूपी योद्धाशी होणार आहे. सातव्या सत्रातील अव्वल स्कोरर पवन कुमार सेहरावत बंगळुरू बुल्सचा युवा खेळाडूंनी सुसज्ज यू मुंबाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. बंगळुरू संघात मागील सत्रात दबंग दिल्लीकडून चांगली खेळी करणाऱ्या चंद्रन रंजीतचा देखील समावेश आहे. यू मुंबाच्या अपेक्षा फजल अत्राचलीच्या नेतृत्वात डिफेन्समध्ये सर्वोत्तम कामगिरीवर टिकलेल्या आहेत. रेडर अभिषेक व अजीत ही युवा जोडी विरोधी संघाच्या अनुभवी डिफेन्सला भेदण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या सामन्यात तेलुगु टायटन्सच्या अपेक्षा सिद्धार्थ देसाई व रोहित कुमार या अनुभवी रेडिंग जोडीवर टिकून असतील. तमिल थलाइवाजच्या डिफेन्समध्ये दरम्यान त्यांची वाट ‘ब्लॉक मास्टर’ सुरजीत करेल, ज्याच्याकडे पीकेएलच्या इतिहासात सर्वात जास्त (११६) यशस्वी ब्लॉकचा अनुभव आहे. गतविजेता बंगाल वॉरियर्स आपल्या मोहिमेची सुरुवात यूपी योद्धाच्या बळकट संघाविरुद्ध करेल. यूपीचा संघ पाचव्या सत्रात लीगमध्ये समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक वेळी प्लेऑफ गाठण्यास यशस्वी राहिला. यावेळी देखील लिलावात संघाने पीकेएलचा सर्वात महागडा रेडर प्रदीप नरवालला आपल्या संघात समाविष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …