ठळक बातम्या

प्रिती झिंटाने दाखवली आपल्या पहिल्या मुलाची झलक


बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा नुकतीच सरोगेसीद्वारे जुळ्या मुलांची आई बनली आहे व सध्या ती आपले मातृत्व एंजॉय करत आहे. आता तिने या मुलांपैकी एका मुलाची झलक दाखवली आहे. प्रिती झिंटा आणि जेन गुडइनफ हे दोघे मुलगा जय आणि मुलगी जिया यांचे पालक बनले आहेत. प्रितीने 29 फेब्रुवारी 2016 मध्ये जेनसोबत लॉस एंजेलिसमध्ये विवाह केला होता. विवाहानंतर प्रिती कायमचे तिकडेच वास्तव्य करत आहे.
प्रितीने मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आपल्या मुलाला हलक्या निळ्या रंगाच्या ब्लॅँकेटमध्ये लपेटून कुशीत घेतलेली दिसून येतेयं. खरेतर मुलाचा चेहरा दिसत नाहीयं. हसत असलेल्या प्रितीच्या खांद्यावर बर्पचा कपडाही दिसून येत आहे. प्रितीने याचबरोबर लिहिले आहे,’ बर्प क्लॉथ्स, डायपर्स ॲँड बेबीज…आय एम लव्ह इट ऑल हॅशटॅग टिंग.’प्रिती झिंटाने नोव्हेंबरमध्ये आई बनण्याची माहिती सोशल मिडियावर दिली होती. प्रिती झिंटाने 1998 मध्ये मणिरत्नम यांचा चित्रपट दिल से द्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर ती सोल्जर, क्या कहना, दिल चाहता है, कल हो ना हो, कोई मिल गया तसेच वीर जारा सारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली. प्रीति झिंटा गेल्या वेळेस 2018 मध्ये ॲक्शन कॉमेडी चित्रपट भैयाजी-सुपरहिटमध्ये दिसून आली होती.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …