ठळक बातम्या

प्रभासने पटकावला टॉप ग्लोबल एशियन सेलिब्रेटीचा किताब


पॅन इंडियन स्टार आणि साऊथ इंडियन सुपरस्टार प्रभास याचा नंबर वन साऊथ एशियाई सेलीब्रेटीच्या रुपात समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या ईस्टर्न आय वृत्तपत्राद्वारे जारी करण्यात आलेल्या या यादीत 50 आशियाई हस्तींच्या नावाचा समावेश आहे. या यादीत प्रभासला नंबर वन दक्षिण आशियाई सेलीब्रेटीचा किताब देण्यात आला आहे. प्रभासने अनेक हॉलीवूड आयकॉन, संगीत उद्योग, टेलीव्हीजन, साहित्य व सोशल मिडिया स्टारची पिछेहाट करत आपल्या साठी हे स्थान निर्माण केले आहे. तर प्रियांका चोप्रा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इस्टर्न आय एंटरटेनमेंट एडिटर असजद नजीर यांनी ही लिस्ट रिलीज केली आहे. सिनेमावरील प्रभासचे ट्रान्सफोर्मेटिव्ह इफेक्टविषयी बोलताना ते म्हणाले,’ प्रभासने भारतात क्षेत्रीय भाषेतील चित्रपटांकडे अशा पद्धतीने लक्ष वेधून घेतले आहे जे पूर्वी कधीही पाहण्यात आले नाही. त्याने दाखवून दिले आहे की बॉलीवूड हा काही बॉस नाहीयं आणि त्याने सर्वांना एकाच वेळी अनेक भाषांमध्ये भारतीय चित्रपट रिलीज करण्यासाठी प्रेरित केले.
मात्र प्रभासने याविषयी अद्याप कोणतेही कमेंट्स केलेले नाहीत. सध्या तो आपले आगामी चित्रपट राधेश्याम, आदिपुरुष, सालार आणि स्पिरीटवर लक्ष केंद्रीत करुन आहे. प्रभासच्या या यशाबद्दल बोलताना राधेश्यामचे दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी सांगितले की प्रभास कौतुकासाठी पात्र आहे. तो सेटवर ज्या जुनूनने येतो ते शिकण्याजोगे आहे. प्रेक्षकांसाठी आम्ही राधेश्यामबरोबर जी जादू निर्माण केली आहे ती दाखवण्यासाठी मी उत्साहित आहे.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …