ठळक बातम्या

प्रभासने ‘आदिपुरुष’साठी घेतलीये इतकी मोठी रक्कम?

फिल्म स्टार्सबद्दल बोलायचे झाले, तर काही असे आहेत, ज्यांच्यावर फिल्ममेकर्सला कमालीचा विश्वास असतो. हे स्टार्स इतके लोकप्रिय आहेत की, त्यांच्या केवळ चित्रपटांमध्ये असण्यानेच चित्रपट हिट होण्याचा भरोसा मिळतो. त्यामुळे हे स्टार्सही भरभक्कम फी वसूल करताना दिसतात. या स्टार्समध्ये बाहुबलीसारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या तेलगू सुपरस्टार प्रभासचाही समावेश आहे. आता चर्चा आहे की, प्रभासने आपल्या आगामी आदिपुरुष या चित्रपटासाठीही अशीच रक्कम वसूल केली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रभासने आपले आगामी चित्रपट आदिपुरुष आणि स्पिरीटकरिता प्रत्येकी १५० कोटींची रक्कम घेतली आहे. सलमान खान आणि अक्षय कुमारनंतर प्रभास हा गेल्या दहा वर्षांमध्ये इतकी फी घेणारा तिसरा स्टार ठरला आहे. सलमानने सुल्तान आणि टायगर जिंदा हैंसाठी १०० कोटींपेक्षा जास्त फी घेतली होती, तर अक्षयनेही बेलबॉटमसाठी १०० कोटींची फी वसूल केली होती.
ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या आदिपुरुषमध्ये प्रभास व्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनन आणि सनी सिंग दिसून येणार आहेत. हा चित्रपट पौराणिक ग्रंथ रामायणवर आधारित आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments

  1. Pingback: health tests

  2. Pingback: click to read more