प्रदुषणात मुंबईचा जगामध्ये सातवा नंबर

दिवाळी म्हटलं की, फटाके आलेच; पण या रासायनिक फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोहचले आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शुक्रवारी मुंबई हे जगातील सातवे प्रदुषित शहर ठरले होते. लक्ष्मी पूजनाच्या दुसºया दिवशी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १६९ एवढा नोंदवला गेला होता. तर पहिल्या क्रमांकावर ४२६ या गुणवत्ता निर्देशांकासह दिल्ली शहर सर्वात प्रदुषित शहर ठरले आहे.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक जर १०० किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तो समाधानकारक मानला जातो. तथापि जेव्हा हा निर्देशांक १००च्या वर असतो, तेव्हा हवेची गुणवत्ता खालावलेली मानली जाते. निर्देशांक २०१ ते ३०० पर्यंत हानीकारक मानला जातो. या हवामानात मुलांना दम्याचा त्रास आणि हृदय किंवा फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.
याशिवाय ज्यांना हे आजार आहेत, त्यांच्यासाठी हवा अधिक धोकादायक असते. वायू प्रदुषणाचा सर्वाधिक परिणाम हा वृद्ध आणि लहान मुलांवर होतो, तसेच हृदयरोग, श्वसनाचे रोग, कर्करोग यांसारखे आजार असणाºयांना वायू प्रदुषणाचा धोका जास्त असतो. वाढत्या प्रदुषणामुळे डोळ्यांना खाज, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे, अशा तक्रारी उद्भवतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं आवश्यक असते.

आजारी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर जेवण करणे, औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनयुक्त आहार घेणे महत्त्वाचे असते. आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन ‘सी’चा समावेश करणेही गरजेचे असते, तसेच प्रदुषणादरम्यान गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नये.
जेव्हा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० पेक्षा जास्त असतो, तेव्हा प्रत्येकासाठी घराबाहेर जाणं धोकादायक होते; पण अनलॉक होताच शहरभर प्रदुषणामध्ये वाढ नोंदवली आहे. वायू प्रदुषणामुळे हवेतील लहान कण असलेल्या पार्टिकुलेट मॅटरमध्ये लक्षणीय वाढ होते. हे लहान कण श्वास घेतल्यावर हवेमार्फत मानवी शरीरात जातात. ज्यामुळे शरीरातील सर्व मुख्य अवयवांचं गंभीर नुकसान होतं. हे विशेषत: फुफ्फुसांवर परिणाम करतात. हवेत असलेला ओझोन वायू, कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड, सल्फरडायोक्साइड आणि अडीच व १० मायक्रोमीटर व्यासाचे सूक्ष्म कण या प्रदुषकांनी युक्त असलेल्या शहरी वातावरणात वावरणाºया लोकांचा अभ्यास केला असताना, त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले, तसेच जास्त प्रदुषणात वावरणाºया लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका, मेंदूतील रक्तस्राव व हृदयक्रिया बंद होण्याचे प्रमाण अधिक आहे. हवेचे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्यांना वैफल्यग्रस्त करते. वायू प्रदुषणात दिल्लीत राहणाºया लोकांचे आयुष्य साडेनऊ वर्षांनी कमी झाल्याचे नुकतेच दिसून आले.

– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२ \\

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …