ठळक बातम्या

प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा दिलासा नाही

– पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी

मुंबई – मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण यामध्ये माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली होती. जुलै महिन्यात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा यांनी एनआयए विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मंगळवार रोजी सुनावणी झाली, मात्र प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिला नाही.
अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना एनआयएने अटक केली होती. प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक करून ६ महिने झाले आहेत. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन देण्यात यावा याकरिता प्रदीप शर्मा यांच्याकडून मुंबई एनआयए विशेष न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने मंगळवारी प्रदीप शर्मा यांना कुठलाही दिलासा दिला नसून पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. संतोष शेलार या व्यक्तीची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी केल्यानंतर प्रदीप शर्माचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रदीप शर्मा यांच्या घरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेला परवाना संपलेले पिस्तूल व काही जीवंत काडतुसे आढळून आली होती. मनसुख याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यामध्ये प्रदीप शर्मा यांचा सर्वात मोठा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला होता. सचिन वाझे व प्रदीप शर्मा या दोघांनी आनंद जाधव, संतोष शेलार यांच्यासह बऱ्याच वेळा मिटिंग केल्याचेही राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …