मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा आगामी चित्रपट स्पायडरमॅन : नो वे होम प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने भारतात धमाका केला आहे. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकींग सुरु होताच प्रेक्षकांनी त्यावर उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. तिकीट बुकींग वेबसाईटवर लोक ज्या स्पीडने पोहोचत आहे तो पाहता वेबसाईट क्रश होण्याची खबरही येत आहे. भारतात स्पायडरमॅन : नो वे होम हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ व तेलगू मध्ये येत्या 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये इतकी उत्सुकता आहे की अनेक सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाचे शोज 24 तास राहणार आहेत. या चित्रपटाचा पहिला शो 16 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता होणार आहे.
जगभरामध्ये स्पायडरमॅन : नो वे होम हा बॉक्स ऑफीसवर एक नवे रेकॉर्ड बनवण्याची आशा त्याच्या ॲडव्हान्स बुकींगवरुन निर्माण झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार चित्रपटाने भारतातही मार्व्हलचे यावर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट शानची : द लेजेंड ऑफ द टेन रिंग्ज तसेच इटर्नल्सचे रेकॉर्ड मोडित काढले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खुल्या झालेल्या सिनेमागृहांमध्ये सूर्यवंशीच्या प्रदर्शनापूर्वीच या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे वळण्यास भाग पाडले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …