प्रत्येक सामने ‘करो या मरो’चे – डेंगमेई ग्रेस

कोच्चि – विंगर डेंगमेई ग्रेस म्हणते की, भारत आपल्या यजमानपदात होणाऱ्या एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात ‘करो या मरो’च्या सामन्याप्रमाणे खेळणार. भारतीय संघाला ‘ग्रुप ए’मध्ये चीन, चिनी तायपै व इराणसोबत ठेवण्यात आले आहे. २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या काळात मुंबई व पुण्यात होणाऱ्या १२ देशांच्या या स्पर्धेतील नॉकआऊटमध्ये जागा मिळवणे यजमान संघांसाठी मोठे यश असेल. आशिया चषकात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सहआयोजनात होणाऱ्या विश्वचषक २०२३ चे पाच स्थान दावावर लागलेत. म्हणून भारत या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करू पाहिल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यजमानाच्या रूपात अगोदरच फिफा महिला विश्वचषकात जागा मिळवली आहे. आशिया चषकातील पाच संघांना थेट विश्वचषकात प्रवेश मिळेल, तर दोन संघ इंटर महाद्वीप प्ले ऑफच्या माध्यमातून विश्वचषकात जागा मिळवतील. डेंगमेई म्हणाली की, आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या मानसिकतेसह उतरू. हिच ती वेळ, जिथे आम्हाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची आहे. आमच्यासाठी प्रत्येक सामना ‘करो या मरो’ प्रमाणे असेल. प्रत्येक सामन्यात आमच्यासाठी संधी असेल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ)च्या प्रसिद्धीपत्रकात डेंगमेई म्हणाली की, आमच्या गटात इराण, चिनी तायपै व चीन हे सर्व तगडे संघ असून, आम्हाला एका वेळी एकाच संघावर लक्ष केंद्रित करावे लागेल. गटात चीन हा १९ व्या क्रमांकावरील सर्वोत्कृष्ट संघ आहे, तर त्यानंतर चिनी तायपै (३९), भारत (५५) व इराण (७०) यांचा क्रमांक येतो. भारताने नुकतेच चिनी तायपै व इराणचा पराभव केला होता. स्पर्धेत तीन ग्रुप बनवण्यात आलेत. प्रत्येकातील अव्वल दोन संघ व तिसऱ्या स्थानातील दोन सर्वोत्कृष्ट संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवतील. डेंगमेई म्हणाली की, युवा खेळाडू संघात जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. आशियाई चषकासाठी कोच्चित सुरू असलेल्या भारतीय संघाच्या शिबिरात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. शिबिरात भाग घेणाऱ्या २७ खेळाडूंपैकी १३ जणांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे. डेंगमेई म्हणते की, संघात अनेक युवा खेळाडू आहेत. ते सर्व आशियाई चषकात जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …