ठळक बातम्या

प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार

नवी दिल्ली – भारताचे महान बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची बॅडमिंटन जागतिक महासंघा (बीडब्ल्यूएफ)ने यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. बीडब्ल्यूएफने पुरस्कार आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांची निवड केली. भारतीय बॅडमिंटन संघा (बीएआय)ने पुरस्कारासाठी त्यांचे नाव पाठवले होते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे बॅडमिंटनपटू आणि विश्व विजेतेपद पदक जिंकणारे पहिले भारतीय, अशी ओळख असलेले प्रकाश पदुकोण यांना २०१८ मध्ये बीआयएचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. उत्कृष्ट सेवेसाठी बीडब्ल्यूएफ परिषदेने हरियाणा बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह, महाराष्ट्र बॅडमिंटन संघाचे सरचिटणीस एस. ए. शेट्टी, बीएआयचे उपाध्यक्ष ओ. डी. शर्मा, माजी उपाध्यक्ष मानिक साहा यांची नावे दिली आहेत. उत्तराखंड बॅडमिंटन संघाच्या अध्यक्ष अलकनंदा अशोक यांना महिला आणि लैंगिक समानता पुरस्कार दिला गेला आहे. बीएआय सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी प्रकाश पदुकोण यांचे अभिनंदन केले आहे. भारतीय बॅडमिंटन आज ज्या उंचीवर आहे, त्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …