पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी बनावट – गृहमंत्र्यांनी दिला चौकशीचे आदेश

मुंबई – राज्यातील ६२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ती बनावट असून तो एक खोडसाळपणा असल्या गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ६ महिन्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हायरल झाली होती. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले होते.

राज्यात मागच्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर पोलीस दलातील ६२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या बदलीचे स्थान देण्यात आले आहे. मात्र ही यादी बनावट असल्याचे राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. सहा महिन्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारे पोलिसांच्या बदल्यांची यादी प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने असा खोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही देखील नाही, असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून मंत्रालयातील अधिकाऱ्यांना फोन करून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना केल्याची घटना घडली होती. परंतु अधिकाऱ्यांना संशय आल्याने प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करण्यात आला होता. यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन केला असल्याची घटना उघडकीस आली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …