पोलिसांना शिवीगाळ करणे राष्ट्रवादीच्या आमदाराला पडले भारी

  • आमदार राजू कारेमोरेंना अटक

भंडारा – जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी राडा घातला होता, तसेच पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि ५० लाख चोरी केले असल्याचा कारेमोरे यांनी आरोप लावला होता. सोमवारी त्यांना त्यांच्या घरातून भंडारा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर विविध कलमांन्वये त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले होते. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातच धिंगाना घातला होता. आमदारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र रविवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आमदारांच्या घरून ५० लाख रुपयांची रोकड घेऊन एका गाडीतून तुमसरकडे जात होते. यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्ट्राँग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडीचालकाला इंडिकेटर का दिले नाही?, म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासीम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील ५० लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनीदेखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफीदेखील मागितली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …