पोटदुखीचा त्रास, रुग्णाच्या पोटातून निघाले चक्क १५६ किडनी स्टोन्स

हैदराबाद – किडनीमध्ये असलेला लहान आकाराचा एखादा मुतखडाही तुम्हाला मरण यातना देतो, मात्र हैदराबादमधील एका मोठ्या रुग्णालयात डोळे विस्फारणारा प्रकार समोर आला आहे. ५० वर्षीय रुग्णाच्या मूत्रपिंडातून विक्रमी १५६ किडनी स्टोन बाहेर काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मोठ्या शस्त्रक्रियेऐवजी लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी पद्धतीने मुतखडे बाहेर काढले.

लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी वापरून एकाच रुग्णाच्या मूत्राशयातून बाहेर काढण्यात आलेली मुतखड्यांची ही देशातील विक्रमी संख्या आहे. ही शस्त्रक्रिया जवळपास तीन तास चालली होती. प्रीती युरॉलॉजी अँड किडनी हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी झाली. संबंधित रुग्णाची प्रकृती उत्तम असून, त्याची दैनंदिन कामेही सुरू झाली आहेत. मुतखड्यांची शस्त्रक्रिया झालेला रुग्ण हा व्यवसायाने शिक्षक आहे. त्याच्या पोटात अचानक दुखायला लागले होते. तपासणी केली असता त्याच्या मूत्रपिंडात अनेक किडनी स्टोन्स दिसले. विशेष म्हणजे मूत्रमार्गाऐवजी त्याच्या पोटाजवळ हे स्टोन्स होते. मात्र असामान्य स्थितीत असलेल्या किडनीतील मुतखडे काढून टाकणे हे आव्हानात्मक काम होते, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णाच्या पोटात कदाचित दोन वर्षांपासून मुतखडे तयार होत असावेत, मात्र त्याला कुठलीही लक्षणे दिसली नसावीत, मात्र अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याला चाचण्या कराव्या लागल्या. ज्यामध्ये अनेक किडनी स्टोन्सचे निदान झाले. त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेऐवजी लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. चंद्रमोहन यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …