साओ पाऊलो – ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना साओ पाऊलो रुग्णालयातून सुट्टी मिळाली, पण त्यांच्यावरील कोलोन ट्युमरवरील औषधोपचार सुरूच राहील. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, एडसन अरांतेस दो नासिमेंतो यांना इसरेलिटा अलबर्ट आइंस्टीन रुग्णालयातून गुरुवारी सुट्टी मिळाली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे व त्यांच्यावर कोलोन ट्युमरवर औषधोपचार सुरू राहतील. पेले यांना डिसेंबरच्या सुरुवातीला केमोथेरेपीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. त्याआधी ट्युमर काढण्यासाठी पार पडलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान ते एक महिना रुग्णालयात होते. पेले यांनी सोशल मीडियावर आपल्या तारुण्यातला एक पोटो टाकला, ज्यावर ते म्हणाले की, या फोटोतील हास्य काही इतर कारणांमुळेच आहे. जसे मी म्हणालो होतो की, मी ख्रिसमसमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणार. मी घरी परतलो आहे. सर्वांना शुभेच्छांसाठी धन्यवाद.