ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्कस हॅरिसच्या मते, टिम पेनला सर्व खेळाडूंचा पाठिंबा प्राप्त आहे व तो म्हणाला, या माजी कसोटी कर्णधार व मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी याबाबत अद्याप कोणतीच चर्चा केलेली नाही. हॅरिसने सोबतच खुलासा केला की, खेळाडूंना कर्णधारपद सोडण्याच्या पेनच्या निर्णयाची माहिती शुक्रवारी प्रसारमाध्यमांतून अर्ध्या तासानंतर कळली. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना हॅरिस म्हणाला, ही माहिती स्वीकारणे सोप्पे नव्हते. हा धक्कादायक निर्णय होता. टिम पेन निश्चितपणे एक सर्वोत्तम कर्णधार आहे. माझ्या व माझ्या कुटुंबाबाबत त्याची भूमिका खूप चांगली राहिली. टिम, त्याची पत्नी बोनी, मुले व कुटुंबाबत माझ्या संवेदना आहेत. तो पुढे म्हणाला, जर कोविडचे कोणतेच कारण नसेल तर मी सुरुवातीला त्याची गळाभेट घेईन. हे कळल्यानंतर की, २०१७ मध्ये पेनने आपल्या सहयोगी महिला कर्मचारीला वादग्रस्त संदेश पाठवले होते, ज्यामुळे मागील शुक्रवारी त्याने ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. हॅरिस म्हणाला, त्याने मागील काही वर्षांत कठीण परिस्थितीत वास्तवात खूप चांगले काम केले. तो अद्याप देशातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. त्याने भारतविरुद्ध मागील उन्हाळ्यांत चांगली फलंदाजी केली. आपले सर्व १० कसोटी सामने टिम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणारा हॅरिस म्हणतो, मला माहीत आहे की, सर्व खेळाडूंचा त्याला पाठिंबा असेल.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …