पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा सीन नदीकिनारी

पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा उद्घाटन सोहळा अनोखा होणार असून, त्यामध्ये हजारो ॲथलिट्स सीन नदीवर नौकांवर स्वार होणार आहेत. यावेळी जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या मागील बाजूस अस्ताला जाणारा सूर्य विशाल सुवर्ण पदकासारखा दिसून येणार आहे. पॅरिस ऑलिमिपक २०२४ च्या उद्घाटन सोहळ्याबाबत सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात माहिती दिली गेली. आयोजकांना आशा आहे की, ऑलिम्पिकच्या इतिहासातील हा अनोखा सोहळा ठरेल जो नदीकिनारी हजारो ऑलिम्पिकप्रेमी नि:शुल्क पाहू शकतील. सर्वसाधारणपणे उद्घाटन सोहळे स्टेडियममध्ये आयोजित केले जातात, परंतु पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने हा सोहळा काहीसा वेगळा करण्याचे आधीच संकेत दिले होते. हा सोहळा २६ जुलै २०२४ रोजी होणार आहे. सोहळ्याची सुरुवात सर्व २०० संघांमधील खेळाडूंच्या संचलनाने होईल. संचलन हे सर्वसाधारणपणे समारोपाच्या वेळी आयोजित केले जाते, मात्र हा सोहळा त्याला अपवाद करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …