ठळक बातम्या

पृथ्वीची गूढ नदी जिचे पाणी नेहमी उकळत असते

जगात अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत, ज्याबद्दल माणसाला सर्व काही माहीत असणे अशक्य आहे. या पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून जीवसृष्टी असली आणि माणसाला अनेक गोष्टींची खोलवर माहिती झाली असली, तरी आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे उत्तर आपल्याकडे नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का की, पेरूमध्ये एक नदी आहे जी दिवसाचे २४ तास, वर्षाच्या प्रत्येक दिवशी उकळते?
होय, तुम्ही ते बरोबर वाचले, खळखळणारी नदी. उकळती नदी म्हणून ओळखली जाणारी ही नदी सुमारे ७ किलोमीटर लांब आहे. एका बिंदूपर्यंत ही नदी ८० फूट रुंद होते, तर एका ठिकाणी तिची खोली १६ फुटांपर्यंत असते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नदीच्या आजूबाजूला कोणताही ज्वालामुखी नाही. त्यामुळे नदीच्या उकळत्या पाण्याच्या मागे लाव्हा किंवा ज्वालामुखी नाही. ही नैसर्गिकरित्या उष्ण नदी आहे, म्हणून शास्त्रज्ञ तिला जगातील सर्वात मोठी थर्मल नदी मानतात.

येथील वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉनच्या जंगलांमध्ये या नदीमध्ये सॉल्ट रिव्हर आणि हॉट रिव्हर नावाच्या दोन नद्या एकत्र येतात. ज्याची लांबी इङ्म्र’्रल्लॅ फ्र५ी१पेक्षा खूपच लहान आहे. नास डेलीच्या यूट्यूब चॅनेलनुसार, पाण्याचे तापमान ९० अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त पोहोचते. आश्‍चर्याची बाब म्हणजे उकळत्या पाण्यामुळे त्यात पडणारा कोणताही प्राणी दगावतो. गरम पाण्यामुळे पायाला फोड येतात. त्यामुळे माणसांना त्यात चालणेही अवघड झाले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते हे पाणी गरम पाण्याचे झरे आहे. पृथ्वीच्या उष्णतेने पाणी गरम होते आणि बाहेर पडते. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक जमाती राहतात, जे वर्षानुवर्षे या नदीला पवित्र मानतात. त्यांच्या मते नदीच्या पाण्यात जखमा आणि घाव भरून काढण्याची ताकद आहे. त्यामुळे लोकांवरही पाण्याचा उपचार केला जातो. नदी जसजशी पुढे जाते तसतशी ती थंड होते, त्यामुळे मधल्या भागात येथे येणारे पर्यटक पोहण्याचा आणि नैसर्गिक जकुझीचाही आनंद घेतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …