ठळक बातम्या

पुरस्कार न मिळालेल्यांच्या मते पुरस्कार बिनमहत्त्वाचा – अभिषेक बच्चन

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने याने आजवर भलेही कोणताही हिट चित्रपट दिलेला नाही आहे, परंतु अनेकांच्या मते अभिषेक आपली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. गेल्या काही काळापासून अभिषेक वेब सीरिज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्यातील कलागुण प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसतोय. विशेष म्हणजे त्याचे हे प्रयत्न यशस्वीही ठरत आहेत. ब्रीद इन टू द शॅडोज आणि बिग बुल मधील अभिषेकचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

आता ज्युनिअर बच्चन ‘बॉब बिस्वास’ या बहुचर्चित चित्रपटात दिसून येणार आहे. विद्या बालनचा सुपरहिट चित्रपट कहानीमधील ‘बॉब बिस्वास’ ही एक अशी व्यक्तिरेखा होती जो एलआयसी एजंट असतो आणि पार्ट टाईम किलर देखील! आता ही दमदार व्यक्तिरेखा अभिषेक बच्चन पडद्यावर साकारताना दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनबरोबरच अभिषेकने पुरस्कारांबद्दलचे आपले मतही व्यक्त केले. मुळात जेव्हा अभिषेकला विचारणा करण्यात आली की, तुझ्या मते पुरस्कारांचे काय महत्त्व आहे व त्याला वाटते की त्याचा परफॉर्मन्स हा पुरस्काराचा दावेदार आहे? तर या प्रश्नाला उत्तर देताना अभिषेक बच्चन म्हणाला,’प्रत्येक जण कौतुक मिळवण्यासाठी काम करत असतो आणि पुरस्कार हे त्या कौतुकाचेच एक रूप आहे. प्रत्येकाला पुरस्कार हवा असतो, परंतु केवळ तेच लोक म्हणतात की पुरस्कार खास नाही ज्यांना कधी पुरस्कार मिळालेलाच नाही. पुरस्कार हा प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. जर कुणी म्हणत असेल की मी पुरस्कार मानत नाही, तर ती व्यक्ती साफ खोटे बोलत आहे. कारण आपल्याला पुरस्कार मिळालेला नाही. साधी सोप्पी गोष्ट आहे. आम्ही सर्व कलाकार आहोत आणि कलाकाराचे जेव्हा कौतुक होते तेव्हा ते पुरस्कारापेक्षा कमी नसते. आम्ही कौतुक मिळवण्यासाठी खूप काम करतो. हाच आमचा बिझनेस आहे. आपली आर्थिक स्थिती यामुळेच सुधारते. जर आपण एखाद्या अभिनेत्याचे कौतुक करता तर त्यामुळे त्याला आनंद मिळतो. जर आपल्याला पुरस्कार मिळत नाही याचा अर्थ तुम्ही लेाकप्रिय नाही आहात किंवा मग तुमचे काम चांगले नव्हते.
अभिषेक बच्चनचा चित्रपट ‘बॉब बिस्वास’च्या ट्रेलरने त्यांचे पिता आणि इंडस्ट्रीचे शहेंशाह अमिताभ बच्चन यांना प्रभावित केले आहे. शनिवारी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला व लिहिले की त्यांना आपला मुलगा अभिषेक बच्चनचा अभिमान आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …