पुन्हा एकदा मोंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार विद्या बालन

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारी अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच चित्रपटांमधील आपल्या व्यक्तिरेखांमुळे चर्चेत असते. खासकरून तिची भुलभुलैयामधील मोंजुलिकाची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि आता तर विद्या पुन्हा एकदा भुल भुलैया २ मध्ये मोंजुलिकाच्या व्यक्तिरेखेत आमी जे तोमार वर नृत्य सादर करताना दिसून येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांचे म्हणणे आहे की, भुलभुलैयामधील त्यांची सर्वात आवडती व्यक्तिरेखा मोंजुलिकाची आहे. ते पुढे म्हणाले, ‘जर ती भुलभुलैयामध्ये आहे, तर ती भुलभुलैया २ मध्येही असायला हवी. अन्य लोकांना आश्चर्यचकीत करण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार विद्या आणि अनीस यांचे इक्वेशन २०११ पासून आहे. भुलभुलैया २ हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या भुलभुलैयाचा जरी सिक्वल असला, तरी चित्रपटाची कथा भुलभुलैयापेक्षा खूप वेगळी आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज बॅनरअंतर्गत निर्मित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली असून, आता हा चित्रपट २५ मार्च, २०२२ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …