पुन्हा अय्यरने साकराली दमदार १५१ धावांची खेळी


मुंबई – देशांतर्गत सुरु असलेली महत्त्वाची क्रिकेट मालिका विजय हजारेट्रॉफी स्पर्धा सुरु आहे.या स्पर्धेमध्येमहाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मध्य प्रदेशचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यर हेदोघे उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.ऋतुराजने महाराष्ट्रसंघाचे नेतृत्व करत सलग तीन शतके ठोकली आहेत तर अय्यरने मध्य प्रदेशकडून खेळताना १० षटकारांची अतषबाजी करत १५१ धावांची खेळी साकारली.त्यांच्या या कामगिरीमुळेत्यांना भारतीय एकदिवसीय संघाचेप्रमुख दावेदारी मानलेजात आहेत.हे दोन्ही खेळाडू भारताकडून टी-२० खेळले आहेत, पण अजूनही त्यांना एकदिवसीय खेळण्याची संधी मिळाली नाही. हे दोघंही सध्या विजय हजारेट्रॉफीमध्ये खेळत आहेत. हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापतीमुळे व्यंकटेश अय्यरला संधी मिळणेजवळपास निश्चित आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीमध्येभारताला व्यंकटेश अय्यरच्या रुपात फिनिशर आणि फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
अय्यरनेरविवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चंदिगडविरुद्धच्या सामन्यात शानदार १५१ धावा केल्या. मध्य प्रदेशने१३.४ षटकांमध्ये५६ धावांत ४ गडी गमावले होते. व्यंकटेश अय्यर सहाव्या क्रमांकावर मैदानात आला आणि चंदिगडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने ८८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. ११३ चेंडूंमध्ये८ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने१५१ धावा करून अय्यर आऊट झाला. त्याच्या या खेळीमुळे मध्य प्रदेशने चंदिगडला विजयासाठी ३३१ धावांचेआव्हान दिले. विजय हजारे ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात व्यंकटेश अय्यरचं हे दुसरं शतक आहे. याआधी त्याने केरळविरुद्ध ९ डिसेंबरला ८४ चेंडूंमध्ये११२ धावा केल्या. याशिवाय त्यानेगोलंदाजीमध्येही कमाल केली होती. अय्यरनेत्या सामन्यांमध्ये३ विकेट घेतल्या होत्या. एक दिवस आधी उत्तराखंडविरुद्ध त्याने७१ रनची खेळी केली आणि २ विकेटही मिळवल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …