ठळक बातम्या

पुण्यात किरकोळ वादातून मित्राची हत्या

  • हत्यारासह आरोपी थेट पोलीस ठाण्यात

पुणे – गमतीत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे, तसेच हत्येनंतर आरोपी मित्राने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मित्राला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
अमन अशोक यादव (२६), असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. तर, चेतन पाटील, असे हत्या करणाऱ्या मित्राचे नाव आहे. पुण्यातील आसरीएम गुजराती शाळेसमोरील फुटपाथवर ही घटना घडली. आरोपी चेतन पाटील आणि अमन अशोक यादव हे दोघेही चांगले मित्र होते. ते कचरा वेचण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये अगदी किरकोळ कारणावरून वाद झाला. अमन ते विसरला; पण चेतनने त्याचा राग डोक्यात ठेवला होता. बुधवारी १ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ते दोघे कचरा गोळा करण्यासाठी भेटले. कचरा गोळा करण्यासाठी जेव्हा ते आसरीएम गुजराती शाळेसमोर आले. येथील फुटपाथवर ते कचरा गोळा करण्याचे काम करत असताना, त्यांच्यात पुन्हा थट्टामस्करी सुरू झाली. याचे रूपांतर वादात झाले आणि रागाच्या भरात चेतन पाटीलने अशोक यादववर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर अमनला त्याच अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. हातात रक्तरंजित चाकू घेतलेल्या चेतन पाटीलला पाहून काही काळ पोलिसांचीही धांदल उडाली. चेतन पाटीलने पोलिसांना घडलेली सर्व हकीगत सांगितली आणि त्याने अमनची हत्या केल्याचे कबूल केले. चेतनने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा तिथे त्यांना अमन यादवचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, आरोपी मित्र चेतन पाटीलला ताब्यात घेतले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …