ठळक बातम्या

पुण्यात एसटी कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

पुणे – राज्यातील एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर कामगार अर्धनग्न आंदोलनास बसले होते. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ज्या राज्यकर्त्यांनी सत्ता भोगली किंवा विरोधी बाकावर राहिले, त्यांनी आजवर तुमचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी आंदोलन मागे घेतले, कारण आमचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा होती. मात्र, आता आम्ही मागे हटणार नसून, राज्य सरकारने लवकरात लवकर एसटीच्या विलिनीकरणाचा आदेश काढावा, अन्यथा अधिक तीव्र लढा उभारला जाईल. तुमच्यामुळेच आमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, आजवर आम्ही कोणताही सण कुटुंबासोबत साजरा केला नाही. एवढे तरी राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …