पुण्यात आईच्या हत्येनंतर मुलाची आत्महत्या

पुणे – धनकवडीमधील सहकारनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने स्वत:च्या आईला औषधांचा ओव्हरडोस देत त्यांचा चेहरा प्लास्टिक पिशवीत घालून हत्या केली व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश मनोहर फरताडे, असे मुलाचे नाव असून, निर्मला मनोहर फरताडे असे आईचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गणेश फरताडे पुण्यातील धनकवडी येथील अक्षय गार्डन सोसायटीमध्ये आपल्या आईसह राहत होता. काही दिवसांपूर्वीच आपली नोकरी गेल्याने गणेश बेरोजगार होता, तसेच त्याने इतरांकडून मोठ्या प्रमाणात कर्जदेखील घेतले होते. त्यामुळे लोकांनी त्याच्याकडे कर्ज परत फेडण्यासाठी तगादा लागला होता. या साऱ्या अडचणींमुळे त्याने हा मार्ग पत्करला, असे त्याच्या जवळच्यांनी सांगितले. त्याने आधी आईला औषधांचा ओव्हरडोस दिला नंतर त्या बेशुद्ध पडल्यावर प्लास्टिक पिशवी गळ्यात घालून दोरीने घट्ट बांधून त्यांचा खून केला. त्यानंतर घराच्या छतावर जाऊन त्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक मुलानी अधिक तपास करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …