पुढील सामन्यात उपस्थित राहू शकतो हार्दिक?

दुबई – भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याला पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सुरुवाती सामन्यात लागलेली दुखापत गंभीर नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यात आयपीएलमध्ये गोलंदाजी न करणारा पंड्या आता फलंदाजाच्या रूपात खेळत आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्याने आठ चेंडूंत ११ धावा केल्या. तो वेगवान गोलंदाजांसमोर खेळताना डगडगत होता, या काळात एक शॉर्ट पिच चेंडू त्याच्या खांद्यावर आदळला. बीसीसीआयच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हो, हार्दिकचे स्कॅन रिपोर्ट आले आहे व दुखापत काही गंभीर नाही. त्याशिवाय दोन सामन्यांमध्ये सहा दिवसाचे अंतर असून, त्याच्याकडे दुखापतीतून सावरण्याची योग्य वेळ आहे. ते पुढे म्हणाले, पण निश्चित रूपात वैद्यकीय पथक सराव सत्रादरम्यान त्याच्या स्थितीवर नजर ठेवतील. पंड्या नुकतेच म्हणाला होता की, मला नॉकआउटमध्ये गोलंदाजी करण्यास आवडेल, पण भारताला त्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विजय नोंदवावा लागेल. या सामन्यातील पराभव त्यांच्या पुढील शक्यतांना धक्का लावू शकते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …