पुढच्या ७ दिवसांत होऊ शकते नव्या सीडीएसची नियुक्ती

नवी दिल्ली – देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. यानंतर आता केंद्र सरकार लवकरात लवकर नव्या सीडीएसची नियुक्ती करण्याबाबत विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात ते १० दिवसांमध्ये देशाला नवे सीडीएस मिळण्याची शक्यता आहे. यासाठीच्या नियमांनुसार सशस्त्र दलांमधील कमांडिंग आॅफिसर किंवा फ्लॅग आॅफिसर या पदासाठी पात्र ठरतो.
बुधवारी रावत हे तमिळनाडूमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जात होते. यावेळी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि १२ अधिकारी आणि जवान यांचे निधन झाले. धुक्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे. वायुदलाने या दुर्घटनेच्या तपासासाठी कोर्ट आॅफ एन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ च्या स्वातंत्र्यदिना दिवशी सीडीएस या पदाबाबत घोषणा केली होती. लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांचे प्रमुख असे हे पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर २०२०च्या जानेवारीमध्ये जनरल बिपीन रावत यांनी देशाचे पहिले सीडीएस म्हणून कार्यभार स्वीकारला होता. रावत यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सैन्यदलांनी बरेच महत्त्वपूर्ण मिशन्स पार पाडले. यामध्ये पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राइक अशा बºयाच मोहिमा सांगता येतील. रावत यांना सेनेतील त्यांच्या कामगिरीसाठी सन्मान प्राप्त झाले आहेत.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …