पुढच्या महिन्यात ७ डिसेंबर रोजी भारताच्या मार्केटमध्ये 2021 Tiguan Facelift लाँच करण्याची घोषणा Volkswagen India ने केली आहे. कंपनीने गुरुवारी सोशल मीडियाद्वारे 2021 Tiguan फेसलिफ्ट लाँच करण्याची घोषणा केली. फोक्सवॅगनची ही दमदार एसयूव्ही बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेल्या Jeep Compass, Citreon C5 AirCross एअरक्रॉसशी थेट स्पर्धा करेल.
Tiguan फेसलिफ्ट कंपनीने गेल्या वर्षीच जागतिक बाजारात उपलब्ध करून दिली होती आणि काही दिवसांनी ती भारतातही उपलब्ध होईल. Tiguan फेसलिफ्ट ही SUV कंपनीच्या इंडिया 2.0 धोरणाचा भाग म्हणून येत आहे. जर्मन कार दिग्गज कंपनीने यापूर्वीच भारतात लाँच करण्याची घोषणा केलेल्या चार SUV पैकी ही एक असेल. प्री-फेसलिफ्ट टिगुआन प्रमाणेच, Tiguan Facelift ला भारतातच स्थानिकरित्या असेंबल करून कारची किंमत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध परवडणारी ठेवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये काही बदल बघायला मिळतील. यासोबतच त्याचे फीचर्सही अपग्रेड करण्यात आले आहेत. अपडेट केलेल्या मॉडलमध्ये पुन्हा डिझाइन केलेले नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि नवीन फ्रंट बंपर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारच्या मागील बाजूस VW च्या बॅजखाली ‘TIGUAN’ लिहिलेले आहे. SUV ला पॉवर लिफ्टगेटसाठी अपडेटेड हँड्स फ्री इझी ओपन आणि क्लोज फीचर देखील मिळते. यात फोक्सवॅगन डिजिटल कॉकपिट आणि १५-रंगांची एंबिएंट लाइटिंग सिस्टिम देखील मिळते. LED मॅट्रिक्स हेडलाइट्स आणि LED DRLs समोरच्या बाजूने SUV च्या लुकमध्ये भर घालतात. कारच्या पुढील बाजूस, तुम्हाला एक नवीन बंपर पाहायला मिळेल आणि त्याला त्रिकोणी आकाराचे फॉग लॅम्प देखील दिले गेले आहेत.
या एसयूव्हीमध्ये बरेच प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यात नवीन स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. याशिवाय, क्लायमेट्रोनिक ऑटो क्लायमेट कंट्रोल फंक्शन्ससाठी टच मॉड्यूल आणि हिटेड फ्रंट सीट्स, मागील विंडो डीफ्रॉस्ट आणि एसी मेन्यू उघडण्यासाठी टच बटण मिळेल. SUV मध्ये एक नवीन मॉड्युलर इन्फोटेन्मेंट सिस्टिम देखील मिळते, जी व्हॉइस कंट्रोल, मल्टी-फोन पेअरिंग आणि वायरलेस अॅप-कनेक्ट ऑफर करते. सुरक्षेसाठी, Tiguan मध्ये 6-एअरबॅग्ज, ड्राइव्ह अलर्ट सिस्टम, ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ESP, ASR, EDL, ऑटो होल्ड, हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. या एसयूव्हीच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कंपनीच्या या पेट्रोल एसयूव्हीमध्ये २.०-लिटर ४-सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 187bhp पॉवर आणि 320Nm चा पीक टॉर्क देते. 4-मोशन ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीमने सुसज्ज असलेल्या या SUV ला मानक म्हणून 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.