ठळक बातम्या

पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपला १४ जागा; काँग्रेसचा मात्र पराभव, शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी

पुणे – पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने ३० पैकी १४ जागा जिंकल्या असून, काँग्रेस उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागवला आहे, मात्र काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पीएमआरडीएच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी बुधवारी एकूण ३० जागांसाठी मतदान झाले होते. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने या निवडणुकीत काँग्रेस एकटी पडली होती. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तिसरी आघाडी झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला, तर आघाडीचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत काँग्रेसने बंडखोरी करून उमेदवार दिला होता, मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपने १४ जागा पटकावल्या, तर राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेलाही यश आले. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर एकच जल्लोष केला.
पीएमआरडीएमध्ये शिवसेनेकडे पुण्यात १० आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १९ मते होती, तर भाजपकडे १७२ मते होती. भाजपने या निवडणुकीत १४ उमेदवार दिले होते. त्यांचे हे सर्व उमेदवार विजयी झाले असून, भाजपच्या बाजूने शंभर टक्के निकाल आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडे १० मते होती. त्यामुळे अतिरिक्त मतांचा कोटा भरून काढणे काँग्रेसला कठीण गेले. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने काँग्रेस या निवडणुकीत एकटी पडल्याचे चित्र दिसत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही ८ उमेदवार होते. त्यामुळे राष्ट्रवादीनेही या आठही जागा पटकावल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …