पिया तू फेम चीनू शिकारी यांचे निधन

सन १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कारवां’ चित्रपटातील लोकप्रिय गाणे पिया तू मध्ये अभिनेत्री आणि डान्सर हेलेन सोबत स्क्रिन शेअर करणारा अभिनेता चीनू शिकारी यांचे मंगळवारी निधन झाले. याबाबतची माहिती पवन झा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून दिली आहे.
पवन झा यांनी लिहिले आहे,’चीनू शिकारी, ज्यांनी हेलन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करून पंचम दा यांचे गाणे मोनिका ओ माय डार्लिंग’ ला लिप-सिंक केले, आज ते आपल्या सर्वांना सोडून दुसऱ्या जगात गेले आहेत…आपल्या अभिनय कारकिर्दीत अतिशय मनोरंजक भूमिका साकारण्यासाठी त्यांचे सिनेमाच्या इतिहासात नेहमी आठवण काढली जाईल.’ याशिवाय दिग्दर्शक हृदय शेट्टी यांनीही चीनू शिकारी यांची आठवण काढत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे,’पंचम दा यांच्या पुण्यतिथी दिनी आमचे प्रिय चीनू आम्हाला सोडून गेले…पंचम दांचे व्होकल्स ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा चेहरा.’ चीनू शिकारी हे एक प्रख्यात अभिनेता आणि कोरिओग्राफर होते, जे हेलन यांच्यासोबत पिया तू या गाण्यात दिसून आले होते. पिया तू व्यतिरिक्त चीनू शिकारी यांनी एप्रन मलक ना मायालु मानवी(१९९८), बेनी हुथो बार बार वर्से आवियो(१९९८) व ढोलो मारा मालक नंबर (१९९८)मध्येही काम केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …