फोटोत दिसत असलेली ही महिला ओळखता येते आहे का? ही पिझ्झा खाणारी महिला बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री आहे. तिने एका हॉरर चित्रपटातही काम केले आहे. आता तिच्या या फोटोवरून आणि तिच्या हॉरर चित्रपटात काम करण्यावरून कोणतीही गल्लत करू नकात. कारण तिची अदा पाहून आतापर्यंत हजारो लोक घायाळ झाले आहेत. अखेर आहे तरी कोण ही? ही अन्य कुणी नाही बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री अदा शर्मा आहे.
अदा ही तमिळ पलक्कड अय्यर फॅमिलीतून आहे, परंतु ती मुंबईतच लहानाची मोेठी झाली आहे. दहावीत असतानाच अभिनेत्री बनण्याची खूणगाठ अदाने बांधली होती. प्रत्यक्षात जेव्हा तिने फिल्म इंडस्ट्रीतील एंट्रीसाठी ऑडिशन्स दिले तेव्हा ती रिजेक्ट व्हायची. त्याचे कारण होते ते म्हणजे तिचे कुरळे केस. मेकर्सला वाटायचे ती खूप छोटी आहे. १९२० मध्ये अदाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. ती अतिशय सुंदर आहे. मात्र तिला आपल्या लूक्स सोबत विविध प्रयोग करण्याची सवय आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे हा तिचा फोटो. अदा फारशा चित्रपटांमध्ये भलेही दिसली नसेल परंतु १९२० या चित्रपटात केलेली तिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात पक्की बसली आहे. १९२० व्यतिरिक्त ती हंसी तो फंसी, कमांडो २ आणि कमांडो ३ मध्ये दिसून आली होती.