मुंबई – मुंबई ड्रग्ज केस प्रकरणी आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी सूचक इशारा दिला आहे.
मुंबई ड्रग्स प्रकरणात ज्या पद्धतीची खोटी केस बनवण्यात आली होती, त्यात याआधीच त्यांना जामीन मिळू शकला असता, पण एनसीबी आपली भूमिका बदलत राहिलं, त्यांना जास्त दिवस जेलमध्ये कसं ठेवता येईल, लोकांच्या मनात कशी भीती निर्माण करता येईल, यासाठी ते प्रयत्नशील होते. ज्या अधिकाऱ्याने या मुलांना जेलमध्ये टाकलं होतं, आज तोच अधिकारी भीतीने हायकोर्टात गेला, मुंबई पोलीस जो तपास करत आहे, तो तपास सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी हा अधिकारी आता करत आहे, काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं, आणि आता असं काय झालं की त्यांना मुंबई पोलिसांची भीती वाटू लागली आहे. आम्हाला असं वाटतं की जो फर्जीवाडा त्यांनी केला आहे, तो समोर येण्याची भीती आता त्यांना वाटू लागली आहे. असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …