पिकलचे हिंदी गाणे ‘ प्यार की राहों में…’

मराठी सिनेसृष्टीत वितरण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर संगीत क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने पिकल एन्टरटेन्मेंटच्या समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी सुरू केलेल्या ‘पिकल म्युझिक’ने अल्पावधतीच संगीतप्रेमींच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. पहिल्या गाण्यापासूनच पिकलने रसिकांची आवड जोपासत म्युझिक व्हिडीओंची प्रस्तुती केली आहे. संगीतप्रेमींचे मनोरंजन करण्याच्या या प्रवासात पिकलने आणखी एक नवे पाऊल टाकत ‘प्यार की राहों में…’ या हिंदी गाण्याच्या माध्यमातून आपला नवा प्रवास सुरू केला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या पिकलच्या सर्वच गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेले ‘प्यार की राहों में…’ या गाण्याचे उत्कंठावर्धक पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर गाणेही रसिकांच्या भेटीला आले आहे. दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून, संकलनही त्यांनीच केले आहे. सुप्रसिद्ध गायिका साधना जेजुरीकर यांच्या आवाजातील हे हिंदी गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आहे. रशीद यांनी या गाण्याचे लेखन केले असून, राजा अली यांनी संगीत दिले आहे. दीपिका बिस्वास आणि यश कदम या कलाकारांवर ‘प्यार की राहों में…’ चित्रीत करण्यात आले आहे. अभिनेत्री दीपिका बिस्वासचे दोन हिंदी सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘प्यार की राहों में…’ मध्ये दीपिकाने सुंदर अभिनय आणि नृत्याचे दर्शन घडवले आहे. या गाण्यातील शब्दरचनेसोबतच संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातूनही प्रेमाची जणू बरसात करण्यात आल्याचे रसिकांना गाणे पाहताना जाणवेल, असा विश्वास पिकल म्युझिकचे समीर दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. डिओपी सुनील गुरव यांनी या गाण्याची सिनेमॅटोग्राफी केली असून, अनिकेत गायकवाड व रोहित कदम यांनी कोरिओग्राफी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …