पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले

  • भररस्त्यात तरुणाची हत्या
  • गेल्या दहा दिवसांतील चौथे प्रकरण

पुणे – मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पिंपरी-चिंचवडमधील हत्यांचे सत्र येथे सुरूच आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आणखीन एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुनील सगर (३५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, भररस्त्यात सिमेंट ब्लॉकने ठेचून सुनीलची हत्या करण्यात आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान सुनील हा जीव वाचवण्यासाठी चिखलीमधील एका दुकानात धावला होता, पण आरोपीने तिथे सर्वांदेखत त्याला अमानुषपणे मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर दुकानातून बाहेर येताच सिमेंट ब्लॉकने ठेचून सुनीलची त्या युवकाने हत्या केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कारण, पिंपरी-चिंचवडमधील हत्या सत्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. मागच्या काही दिवसांत सातत्याने पिपंरी-चिंचवडमध्ये हत्येच्या घटना घडत आहेत. १८ डिसेंबरला पिंपळेगुरवरमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये योगेश जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली होती. त्यानंतर २२ डिसेंबरला तळेगावमध्ये इंस्टाग्रामवरील स्टेटस प्रकरणावरून अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दशांत परदेशी असे हत्या झालेल्या १७ वर्षीय मुलाचे नाव होते. एका बंद पडलेल्या कंपनीसमोर मुलाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …