पिंपरी – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, शनिवारी पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारात आंदोलन करणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सूडबुद्धीतून प्रशासन ही कारवाई करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. महामंडळ प्रशासनाने कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस हातात न देता, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. केवळ संप मोडीत काढण्यासाठी शासनाने सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. रोज थोड्या-थोड्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यापेक्षा सर्वांवर एकाच वेळी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: snus