पुणे – कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरील अवजड वाहतूक पहाटे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गांवर प्रवेश बंद असेल. जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गासाठी हा निर्णय लागू असेल.
सोलापूर रोड आणि कामशेत येथील अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरील जड आणि अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ यादरम्यान बंद राहणार आहे. ४ डिसेंबरपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा (कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्या) पार पडेपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. महामार्गांवर झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि पोलीस अधीक्षक (महामार्ग) संजय जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गावर सकाळच्या सुमारास अवजड वाहतूक करण्यास बंदी राहील.
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला शनिवारी (२७ नोव्हेंबर) मोठा अपघात झाला होता. यामध्ये १८ वारकरी जखमी झाले असून, दोघा वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता. खालापूर येथून ही दिंडी आळंदीला पायी निघाली होती, तेव्हा कान्हे फाटा येथे भरधाव पिकअप गाडीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात सविता वाळकू येरभ (५८), रा. उंबरे, रायगड आणि जयश्री आत्माराम पवार (५४), रा. भूतवली, जि रायगड या वारकऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिकअप चालकाला ताब्यात घेतले. खालापूर येथून ही दिंडी आळंदीकडे निघाली होती. जखमी वारकऱ्यांवर कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …