पाय नसलेल्या कुत्र्याला लोकांनी दिले दुसरे जीवन

२०२०मध्ये रशियाच्या लोकांना प्लास्टुनोव्स्काया गावात एक निष्पाप कुत्रा सापडला, ज्याला एकही पाय नव्हते. मोनिका नावाचा हा कुत्रा एक रेस्क्यू डॉग होता, ज्याने सुरुवातीच्या काळात लोकांचे प्राण वाचवले; पण अपघातात त्याचे पाय कापले गेले. जेव्हा लोकांनी त्याला पाहिले तेव्हा ताबडतोब त्याला प्राण्यांच्या डॉक्टर सेर्गेई गोर्शकोव्हकडे नेले. त्यानंतर डॉक्टरांनी कुत्र्याला नवीन जीवन दिले.
असे म्हटले जाते की, माणसाचा सर्वात चांगला मित्र हा कुत्रा असतो, जो त्याच्याशी एकनिष्ठ असतो आणि त्याचे रक्षण करण्यास सदैव तयार असतो, परंतु असे प्रसंग क्वचितच येतात, जेव्हा मानव कुत्र्यांना मदत करतो आणि त्यांना नवीन जीवन देतो. नुकतेच रशियामध्ये असेच काहीसे घडले आहे, जिथे लोकांनी एका रेस्क्यू कुत्र्याला जीवदान दिले. कुत्र्याशी संबंधित ही बातमी आता इंटरनेटवर चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे आणि लोक कुत्र्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सेर्गेने याआधीच अनेक कुत्र्यांना बनावट पाय (डॉग गेट्स प्रोस्थेटिक लेग्स) लावले होते. त्याने मोनिकाचे पाय प्रोस्थेटिकवर ठेवले आणि आता मोनिका स्वत: चालू शकते. डेली स्टारच्या वृत्तानुसार, कुत्रा वेगाने बरा होत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, कुत्रा लवकरच सामान्य जीवन जगण्यास सुरवात करेल. सीएनएनशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना वाटले नव्हते की, मोनिका बरा होईल; पण त्याने कमी वेळात हळू चालायला सुरुवात केली.
रिपोटर््सनुसार, जेव्हा मोनिकाला काही लोकांनी वाचवले, तेव्हा ते तिला थेट अ‍ॅनिमल रेस्क्यू व्हॉलंटियर्सकडे घेऊन गेले. त्यांचा असा विश्वास होता की, कुत्र्याचे पाय अपघातात कापले गेले नाहीत, तर कोणीतरी निर्दयीपणे जाणूनबुजून कापले आहेत. डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर लोकांनी आॅपरेशनसाठी ४ लाखांहून अधिक रुपये उभे केले होते, ज्याच्या मदतीने कुत्र्याला नवीन पाय मिळाले. प्रोस्थेटिकचे पाय आधी थ्रीडी प्रिंटेड आणि नंतर बायोकोटेड केले गेले. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे पाठवले. मी प्राण्यांना नवीन जीवन दिले याचा मला आनंद आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …