पाकिस्तान ठरला १८ टी-२० जिंक णारा पहिला संघ

कराची – एका वर्षात १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा पाकिस्तान क्रिकेट संघ पहिला पुरुष संघ ठरला आहे. पाकिस्तानने सोमवारी (१३ डिसेंबर) आपल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ६३ धावांनी पराभव केला. मोहम्मद रिझवान (७८) आणि हैदर अली (६८) यांनी शानदार फलंदाजी करताना पाकिस्तानने येथे यजमानांसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. मोहम्मद वसीमने चार विकेट्स घेतल्यानंतर गोलंदाजांनी संघाचे काम पूर्ण केले. शादाब खानने तीन विकेट्स घेतल्या आणि अशा प्रकारे पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा डाव १३७ धावांत गुंडाळला. या विजयासह पाकिस्तानच्या संघाने २०२१मधील १८ व्या टी-२० विजयाने २०१८ मधील १७ विजयांचा विक्रम मागे टाकला.
यापूर्वीही हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. २०१८ मध्ये पाकिस्तानने सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिकण्याच्या बाबतीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानने १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने आतापर्यंत ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४ विजय मिळवले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा सक्सेस रेट ६३ टक्क्यांहून अधिक आहे. त्याचवेळी टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यापैकी ३० सामने जिंकले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …