पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटवर बेछूट गोळीबार – ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू

ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू
नवी दिल्ली – पाकिस्तानी नौदलाने रविवारी भारतीय नौकेवर गोळीबार केला. गुजरातच्या किनाºयावर झालेल्या या गोळीबारात एका मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला मच्छीमार हा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुजरातमधील द्वारका येथे ‘जलपरी’ नावाच्या बोटीवर पाकिस्तानी नौदलाने गोळीबार केला. या गोळीबारात श्रीधर चामडे नावाच्या मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एक मच्छीमार जखमी झाला आहे. पाकिस्तानकडून यापूर्वीही भारतीय मच्छीमारांवर अटक करण्याच्या किंवा बोट जप्त करण्याच्या घटना घडल्या आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली होती आणि त्यांच्या दोन बोटी जप्त केल्या होत्या, तर फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने १७ भारतीय मच्छीमारांना जलक्षेत्रात कथितपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि त्यांच्या तीन बोटी ताब्यात घेतल्या होत्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समुद्री सीमेबाबत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे गुजरातच्या किनाºयावर मासेमारी करण्यासाठी जाणाºया बोटींना भारताची हद्द कुठे संपते आणि पाकिस्तानची कुठे सुरू होते, याची नेमकी कल्पना येत नाही. आपल्या देशाच्या हद्दीत घुसखोरी झाल्याचा दावा करत पाकिस्तानकडून भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आला. यात श्रीधर चामडे नावाच्या मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …